2009 ला झी मराठी वाहिनीवर ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ हा आगळावेगळा आणि बच्चेकंपनीसाठी खास असलेला सिंगिंग रियालिटी शो भेटीला आला होता... शोमध्ये अनेक छोटे उस्ताद पाहायला मिळाले आणि त्यातून शो च्या फिनाले पर्यंत पोहोचले ते पंचरत्न म्हणजेच आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे आणि रोहित श्याम राऊत... या पंचरत्नांच्या सुरांची जादू इतकी कमाल होती की त्यांना आजही विसरता आलेलं नाही आहे... या पंचरत्न मधून कार्तिकी गायकवाड हिने त्या वेळी बाजी मारली होती आणि ती सा रे ग म प लिटील चॅम्प्स पहिल्या पर्वाची विजेती ठरली... आता तब्बल 12 वर्षांनी ही पंचरत्न पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहेत... नुकतेच हे चला हवा येऊ द्या च्या मंचावर एकत्र येताना दिसले होते त्यानंतर आता पुन्हा एकदा आपल्या भेटीला ते येणार आहेत...

#SaregamapaLilChamps #Kartikigaikwad #prathameshlaghate #Rohitraut ##lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber